डॉल्बी लावल्यास 5 वर्षे शिक्षा, एक लाखांचा दंड
सांगली : सण, उत्सवात डॉल्बी लावून ध्वनीप्रदूषण केल्यास नियमानुसार 5 वर्षे शिक्षा व एक लाखांचा दंड होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजिंक्यराणा पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विद्यार्थी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजिंक्यराणा पाटील तर कार्याध्यक्षपदी यशवर्धन कदमबांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, सरचिटणीस बसवराज नगराळकर, उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी उमेश पाटील उपस्थित होते.
खा. शरद पवारांनी हवामान खात्याला पाठवली १०० किलो साखर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्याने, पवारांनी दिलेला शब्द पाळला.
पुण्यात कारने घेतला पेट; तिघांचा होरपळून मृत्यू
जुन्नरमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. येथील वडगाव आनंद परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. अपघातामध्ये मृत पावलेले तिघेही जण मेडिकल व्यावसायिक असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे फाटा येथील वडगाव आनंद जवळ स्विफ्ट डिझायर गाडी एम एच- १४, डी एक्स-१२३१ ही गाडी कठड्याला धडकून अपघात झाला. त्यानंतर गाडीने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा जळून मृत्यू झाला. नरेश सखाराम वाघ रा.पिंपळवंडी ता.जुन्नर, दिलीप चंद्रकांत नवले रा.बाभूळवाडा आणि प्रशांत चासकर रा. वडगाव आनंदमळा अशी मृतांची नावे आहेत.
राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; २३ सप्टेंबरला मतदान
विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली.
आता सर्वांना मिळणार हक्काची घरे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठीच ‘सर्वांना घरे’ हा उपक्रम प्राधान्याने राबवीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार किती खर्च करु शकतात ?
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. सरपंचपदासाठीच्या उमेदवार निवडणुकीत 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपये खर्च करु शकतात. तर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार निवडणुकीसाठी 25 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करु शकतात.
उद्धव ठाकरे 9 व 10 सप्टेंबर रोजी पश्‍चिम महाराष्ट्र दौर्‍यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 9 व 10 सप्टेंबरला दोन दिवस सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विशेष करून कर्जमाफीबाबत थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. १० सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांचा साताऱ्याच्या धावत्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे.
राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये गेले तर त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि राणेंचे समर्थक आमदार कालीदास कोळंबकरही भाजपमध्ये प्रवेश करतील.
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 61 उमेदवार विजयी
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेत 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली; सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी : पृथ्वीराज चव्हाण
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मराठा समाजाच्या तोंडालाही या सरकारने पाने पुसली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. राजीव गांधी सद्भावना दौडच्या निमित्ताने ते कोल्हापूर दौऱ्यावर होते.
खंडाळा घाटात हुबळी एक्सप्रेसवर दरड कोसळली; सुदैवानी जीवितहानी नाही
खंडाळा घाटात हुबळी-लोकमान्य टिळक एक्सप्रेसवर मंकीहिलजवळ दरड कोसळली. ही दुर्घटना आज (सोमवारी) सकाळी 6.00 वाजता घडली.
मानसिक आरोग्य क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यात यावेत : डॉ मोहन आगाशे
बदलत्या काळात पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची कमतरता असून मानसिक आरोग्य क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मनोदय मेंटल हेल्थ फोरमने या क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा जेष्ठ मानसोपचार तज्ञ व सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
अंनिसचं सरकारविरोधात 'जबाव दो' आंदोलन
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभुमीवर पुण्यात महाराष्ट्र अंनिसकडुन ‘जवाब दो’ आंदोलन आणि कँडल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे.
राणेंसाठी माझे खाते देण्यास तयार : चंद्रकांत पाटील
नारायण राणे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अद्याप पर्यत ठरलेला नाही. त्यांनी पक्षात याव त्यांचे आम्ही स्वागत करू. त्याच्याबाबत थेट केंद्रातून अमित शहा निर्णय घेत आहेत. ते माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते आले तर नक्कीच फायदा होईल, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे नेते चद्रकांतदादा पाटील यांनी आज (रविवार) येथे केले.
बायकांच्या भानगडी असतील तर त्याही छापा; माझ्या भानगडी मलाच विचारण्यापेक्षा सदालाच विचारा : खा. राजू शेट्टी
माझ्या भानगडी मलाच विचारण्यापेक्षा सदालाच विचारा. असल्या काही बायकांच्या भागनडी तर त्यादेखील छापा, असा उपहासात्मक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश २७ ऑगस्टला ?
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता सूत्रांकडून समजते आहे.
५० रुपयांच्या नवीन नोटा येणार चलनात
नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नवीन नोटा आल्या तशाच प्रकारची ५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार आहे.
कर्जमुक्ती खरेच झाली हे सिद्ध करून दाखवा: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार म्हणतंय की ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. शिवाय राज्यातील एकूण ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे असंही सरकार म्हणतंय. मात्र सरकारनं आम्हाला या सर्व लाभधारक शेतकऱ्याच्या पत्त्यासह नावांची यादी विधानसभेत उपलब्ध करून द्यावी. खरेच या शेतकऱ्यांना लाभ मिळाला का हे याची आम्ही विभागवार तपासणी करू अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलाय. सरकारने जाहीर केलेले आकडे खरे आहेत हे पटवून द्यावं, सिद्ध करून दाखवावं. असं केलं तर आमचा त्यांच्यावरील विश्वास अधिक वाढेल असा टोलाही ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं.
हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान; शेट्टींची आत्मक्लेश यात्रा नव्हे तर क्लेश यात्रा
हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुमची ताकद समजेल, असं खुलं आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे. राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा नव्हे तर क्लेश यात्रा होती, असं म्हणत सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर हल्लाबोल केला. सदाभाऊ खोत सांगलीत बोलत होते.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.