खैर (कत्था, खदीर, कात)
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.
स्वाईन फ्लूवर उपाय
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.
स्वाइन इन्फ्लुएन्झा
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.
गुळवेल (गिलोय)
गुळवेल किंवा गुडुची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) ही भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.
कोरफड (aloe vera)
मुंबई: कोरफडीचे अनेक उपयोग तुम्हांला माहीत असतील. परंतु, कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो हे ठाऊक आहे का ? कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फोलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.
गिलोय
सातारा : गिलोय ही आयुर्वेदातील अतिशय महत्वाची औषधी वनस्पती असून तिला अमृतासमान मानले जाते. आयुर्वेदात तिला गुडुची, अमृता, छिन्नरुहा, चक्रांगी आदी नावांनीही ओळखले जाते. बहुवर्षायू तसेच अमृतासमान असल्यामुळे तिला अमृता असे म्हटले जाते. गिलोयचे अनेक फायदे आहेत.
डेंग्यू ताप
मुंबई: डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्तीन डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यूवर प्रभावी उपाय - गिलोय व एलोवेरा
मुंबई: सध्या जीवघेणा डेंग्यू सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. त्यामुळे अबालवृद्ध भेदरले आहेत. वेळेत उपचार झाले नाहीत तर जीव जाण्याची भिती आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे कुटुंबियही पुरते भेदरुन गेले आहेत.
रेबीज
मुंबई: रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात.
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप)
मुंबई: हा ताप एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा आजार इडास जातींच्या डासांमार्फत पसरतो.डास चावल्यावर ३ ते १० दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औषध नाही. हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र थोडे रुग्ण असल्याने ओळखणे थोडे अवघड जाते.
स्वाईन फ्ल्यू : एक आरोग्य समस्या
सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये फ्ल्यू चे बाधित रग्ण आढळले, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून योग्य तो उपचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ए एच1 एन1 या विषाणूची बाधा होवू नये म्हणून काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नुकतेच आवाहन केले होते. आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी स्वाईन फ्ल्यू बाबत जागृती व्हावी म्हणून हा सविस्तर लेख लिहिला आहे . . .
कार्डिअॅक अरेस्ट
मुंबई: कार्डिअॅक अरेस्टचा अर्थ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणं. हा दीर्घ आजाराचा भाग नाही, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सर्वात धोकादायक मानलं जातं.
कर्णकर्कश आवाजाने फाटतील कानाचे पडदे
मुंबई: कर्णकर्कश, कंठाळी आवाजानं सार्‍यांच्याच आयुष्यावर विपरीत परिणाम होतो आहे.
सावधान! माठांपासून होऊ शकते विषबाधा
मुंबई: उन्हाळा सुरु झाला, की घरोघरी ठेवणीतले माठ बाहेर काढले जातात. घरी नसेल तर बाजारातून एक माठ विकत आणला जातो. आता तर या माठांना नळही असतो. त्यामुळे वारंवार माठात हात टाकण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल, खरंच नळ लावल्याने आरोग्याची किती मोठी समस्या सुटली. पण केवळ नळच नाही तर हा संपूर्ण माठ तुमच्या प्रकृतीसाठी धोकादायक आहे. माठ आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण तो चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे किंवा विकण्यासाठी त्यात विष कालवले आहे.
टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये
मुंबई : टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात.
विजेचा धक्का
विजेचा धक्का (शॉक) हा एक गंभीर अपघात आहे. वीज पडणे आणि घरगुती विजेचा धक्का हे दोन प्रकार आहेत. वीज पडून झालेल्या अपघातात सहसा ती व्यक्ती वाचत नाही. घरगुती विजेमुळे मात्र कमी अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात.
विंचू चावणे
महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात - काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा परंतु कमी घातक असतो. हा काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सापडतो. याउलट मुख्यत: कोकणात सापडणारा लाल विंचू जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.
त्वचारोगतज्ञ डॉ.आदित्य महाजन यांनी अत्याधुनिक तंत्राद्वरे केले हेअर ट्रांसप्लांट
साताराः येथील प्रसिध्द त्वचारोगतज्ञ व लेसरतज्ञ डॉ. आदित्य सुरेश महाजन यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केसरोपण हेअर ट्रांसप्लांट ही शस्त्रक्रिया सातारा येथील समर्थ हॉस्पीटल येथे यशस्वी केली.
तहसीलदारांच्या वाहनाला वाळूच्या ट्रॅक्टरची धडक
म्हसवड: माण तालुक्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाधववाडी, ता. माण येथे माण तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा माने गेल्या होत्या. त्यादरम्यान वाळू खाली करुन आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या वाहनाला ठोकर दिली. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलिसांत दाखल झाली आहे.
सर्पदंश
मुंबई: आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात. पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे. प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.